Ad will apear here
Next
रुबी हॉल क्लिनिकतर्फे ‘फाउंडर्स डे’ निमित्त कार्यक्रम
 डॉ. के. बी. ग्रांट यांच्या स्मरणार्थ आयोजित विशेष कार्यक्रमाबाबत माहिती देताना डॉ. संजय पठारे आणि डॉ. स्नेहल मुजुमदार 

पुणे : ‘रुबी हॉल क्लिनिकचे संस्थापक कै. डॉ. के. बी. ग्रांट यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी,३० नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी एकच्या दरम्यान रुबी हॉल क्लिनिकच्या कॅन्सर बिल्डिंगच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक, समाजसेवक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ. अनिल अवचट उपस्थित असतील, तर प्रमाणित योग हास्य प्रशिक्षक मकरंद टिल्लू हे सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमात मकरंद टिल्लू हे तणावमुक्त जीवनासाठी ‘आर्ट ऑफ लाफींग’ या एक तासाच्या विशेष कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर संयोजक, रक्तदाते, रूबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर्स आणि ब्लड बँक युनिटचे कर्मचारी सहभागी होणार आहेत’, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे आणि ब्लड बँकेच्या संचालिका डॉ. स्नेहल मुजुमदार यांनी दिली. 

डॉ. संजय पठारे पुढे म्हणाले, ‘आपत्कालीन परिस्थितीत गरजू रूग्णांना नवीन जीवन देण्यासाठी रक्त उपलब्ध करून देणारे रक्तदान शिबिर संयोजक आणि रक्तदाते यांचा महत्त्वाचा वाटा आहे. रक्तगट दुर्मिळ असलेले रक्तदातेही दिवस असो किंवा रात्र कोणत्याही वेळी मदतीसाठी धावून येतात. अशा सर्व लोकांचा या कार्यक्रमाद्वारे गौरव करण्यात येणार आहे. गरजू रूग्णांना वेळेवर रक्त मिळवून देणाऱ्या या देवदूतांना आम्ही रक्तदूत असे म्हणतो.’

रूबी हॉल क्लिनिकच्या ब्लडबँकेच्या संचालिका डॉ. स्नेहल मुजुमदार म्हणाल्या, ‘या कार्यक्रमादरम्यान डॉ. अनिल अवचट यांचा एक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये कन्सल्टंट डॉक्टर आणि रक्तदान शिबिर संयोजक, सामाजिक कार्यकर्ते त्यांचे अनुभव सांगतील. या परिसंवादात आयसीयुच्या संचालिका डॉ. प्राची साठे, यकृत प्रत्यारोपण विभागाच्या प्रमुख डॉ. शीतल धडफळे, ‘रक्ताचे नाते’संस्थेचे संस्थापक राम बांगड, रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे, पॅथॉलॉजी लॅबच्या संचालिका व थॅलेसेमिया सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. नीता मुन्शी, कार्डियाक अॅनेस्थेशिया अँड रिकव्हरी विभागाचे संचालक डॉ. बिकाश साहू आणि नर्सिंग विभागाचे संचालक लेफ्टनंट कर्नल सी. सी. क्रूझ यांचा समावेश असणार आहे. रक्तदानासारख्या महान कार्याचे महत्त्व समाजात रूजवणे हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे.’

डॉ. मुजुमदार पुढे म्हणाल्या, ‘पुणे हे ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांची कर्मभूमी आहे. ज्यांचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव आहे. या महान व्यक्तिमत्त्वाची जन्मशताब्दी आपण साजरी करीत आहोत, म्हणूनच आम्ही हा वर्धापन दिन पु. ल. देशपांडे यांना समर्पित करीत आहोत.’

रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले, ‘आतापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली असली तरी रक्ताला दुसरा पर्याय नाही. ते तयार करता येत नाही. त्यामुळेच रक्तदान करणे हे एक महान कार्य आहे. त्यामुळे असंख्य जीव वाचतात आणि त्यांच्या कुटुंबियांना आनंद मिळतो. रक्तदान शिबिरांचे संयोजक आणि रक्तदात्यांना आम्ही सलाम करतो. अशा  दात्यांमुळे मानवता अजूनही जिवंत आहे,याची आपल्याला अनुभूती होते आणि गरजू रूग्ण या देवदूतांमळे संकटाच्या काळातही बाहेर पडू शकतात.’

ग्रांट मेडिकल फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रांट म्हणाले, ‘डॉ. के. बी. ग्रांट हे एक दूरदृष्टी  असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी फक्त पुण्याला भारताच्या वैद्यकीय नकाशावर आणले नाही, तर ते एक नम्र व्यक्ती, उत्तम शिक्षकदेखील होते. ज्यांचे विद्यार्थी आज वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक कमवत आहेत. आम्ही भाग्यवान आहोत की येथील समर्पित कर्मचारी त्यांचा वारसा पुढे नेत रूबी हॉल क्लिनिकला अजून नव्या उंचीवर नेत आहेत. या प्रवासामध्ये रुबी हॉल क्लिनिकच्या ब्लड बँकेने महत्वाची भूमिका बजावली आहे. आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, यंदाचा फाउंडर्स डे आम्ही रक्तदाते व रक्तदान शिबिर संयोजक यांना समर्पित केला आहे,ज्यांनी नि:स्वार्थीपणे रक्तदान करून जीव वाचविले आहेत.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZKMBU
Similar Posts
‘रक्तदान हे माणसाला माणूस जोडणारे आहे’ पुणे : ‘रक्तदान हे माणसाला माणूस जोडणारे आहे. आपण एकमेकांची मदत करणे,एकमेकांना सहकार्य करत राहणे महत्त्वाचे असून, अशा कामातूनच आपण मोठ्या विश्वात जोडले जातो’, असे मत समाजसुधारक व मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. रुबी हॉल क्लिनिकचे संस्थापक कै. डॉ. के. बी. ग्रांट
‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे भाविकांसाठी वैद्यकीय मदत केंद्र पुणे : ‘रुबी हॉल क्लिनिक’तर्फे गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने दगडूशेठ गणपतीजवळ वैद्यकीय मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत असून, येथे भाविकांची वैद्यकीय तपासणीही करण्यात येत आहे
‘पैसे नव्हे, तर माणुसकीच्या आधारावर जगले पाहिजे’ पुणे : ‘सध्या आपण सगळे मिळून न जगता एकट्यापुरते जगत आहोत,पण पैशाच्या दुनियेत न जगता माणुसकीवर आधारित जीवन जगलं पाहिजे’, असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. बोन मॅरो प्रत्यारोपण व बोन मॅरो डोनेशन याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नाअंतर्गत रूबी हॉल क्लिनिक येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
‘व्यायाम व सकस आहाराने मधुमेहावर नियंत्रण शक्य’ पुणे : ‘नियमित व्यायाम आणि सकस आहार घेतला, तर मधुमेहासारख्या आजारावर नियंत्रण ठेवता येते; किंबहुना त्याला दूर ठेवता येते. मधुमेहामुळे शरीरारातील प्रत्येक घटकांवर परिणाम होतो. त्यामुळे मधुमेहाला कशाप्रकारे हाताळावे यासाठी मार्ग व पद्धती शोधायला हव्यात’, असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेज ग्रांट यांनी केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language